मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथे गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी चित्ररथास खासदार रक्षा खडसे यांनी हिरवा झेंडा दाखवला. तीन चित्ररथांद्वारे जळगाव जिल्ह्यात जनजागृती सुरु करण्यात येत आहे.
२०२० हे वर्ष कोरोनामुळे शेतकऱ्यांसाठी मोठे संकट आले आहे. पांढरा कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बीटी कपाशीवर येणाऱ्या गुलाबी बोंड अळीने नुकसान होऊ नये अशी आशा खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केली.
कापुस पिकावर येणाऱ्या चार अळयांपैकी गुलाबी बोंड अळी मध्ये मागील चार ते पाच वर्षात बीटीसाठी प्रतिकार शक्ती निर्माण झाली असून गुलाबी बोंडअळी ही कोणत्याही वाणाची बीटी कपाशी सहजरित्या पचऊ शकते.
अळीस बोंडात जाण्याच्या आधीच रोखणे गरजेचे आहे. यासाठी कृषी विभागातर्फे चित्ररथाद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. चित्ररथ २५ दिवसासाठी फिरणार आहेत व गावोगावी जाऊन चित्ररथाव्दारे व ध्वनीफितीव्दारे जनजागृती करणार आहे. महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागाचे कर्मचारी या चित्ररथासोबत जनजागृती करुन प्रत्येक गावात पोस्टर बॅनर लावणार आहे.
याप्रसंगी बोदवड पं.स. समिती सभापती किशोर गायकवाड, कृषी अधिकारी, बोदवड शहराध्यक्ष प्रदीप बडगुजर, सरचिटणीस निलेश पाटील, मुक्ताईनगर तालुका भाजयुमो अध्यक्ष अंकुश चौधरी, शुभम पाटील व मान्यवर उपस्थित होते.