Home आरोग्य कोरोनाचा कहर टाळण्यासाठी केसीई सोसायटीतर्फे जनजागृती अभियान

कोरोनाचा कहर टाळण्यासाठी केसीई सोसायटीतर्फे जनजागृती अभियान

0
42

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत खास जनजागृती अभियान शुक्रवारी राबविण्यात आले. कोरोनाचा कहर टाळायचा असेल तर मास्क घाला, असे सांगतानाच ज्यांनी मास्क घातले अशा जवळपास १०० नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन प्रोत्साहित करण्यात आले, तर ज्यांनी मास्क परिधान केले नव्हते अशा ३०० नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले. यातून एकाच दिवसात किमान ४०० जणांना सकारात्मक संदेश देण्याचे काम या अभियानाअंतर्गत करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य वाहतूक निरीक्षक देविदास कुनगर उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात उपस्थितांना रस्ते सुरक्षा, कोरोना संबधी घ्यावयाची काळजी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे यांनी अध्यक्षीय भाषणात कोरोना जनजागृती संदर्भात मनोगत व्यक्त केले.

कोरोना पुन्हा वाढत आहे त्यामुळे सध्या मास्क वापरणे हेच योग्य असल्याने त्याबाबत जनजागृती करण्यासह मास्क वापरणार्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शुक्रवारी सकाळपासूनच मू. जे. महाविद्यालय मुख्य प्रवेश द्वारासमोर ही मोहीम विशेष पद्धतीने राबविण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण कोल्हे व महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. वंदना चौधरी यांनी केले होते.

याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी, केसीई सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी प्रा.संदीपकुमार केदार, विभाग प्रमुख प्रा.निलेश जोशी, डॉ. शैलजा भंगाळे, संजय जुमनाखे, प्रा.केतकी सोनार, मोहन चौधरी, निलेश नाईक, शैलेश कुलकर्णी, विनोद पाटील हे उपस्थित होते.


Protected Content

Play sound