Home Cities जळगाव राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार संजय वानखेडे यांना प्रदान

राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार संजय वानखेडे यांना प्रदान

0
118

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे नुकताच  राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार संजय भादूजी वानखेडे यांना प्रदान करण्यात आला.

 

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक संजय वानखेडे यांना राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार देवून  गौरविण्यात आले. त्यांना प्रमुख अतिथी आ. किशोर पाटील, आ. राजुमामा भोळे, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील,  सेवानिवृत्त मेजर सुरेश पाटील, डॉ. प्रभू व्यास, अध्यक्षा संदीपा वाघ आदींच्या हस्ते स्मुर्तीचिंह,प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

संजय वानखेडे हे जळगाव येथील  शेठ. ला.ना. सा.विद्यालयात गेल्या २७ वर्षापासून सेवारत असून ते SET,NET.PET या परीक्षा उत्तीर्ण आहेत. ते उपक्रमशील शिक्षक आहेत.  जळगाव जिल्ह्यातील चर्मकार समाजातील विविध सामाजिक संघटनांमध्ये ते विविध पदांवर सक्रिय कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत अनेक समाजोयोगी उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले आहे.  या कार्याची दखल घेऊन राजनंदिनी संस्थेमार्फत त्यांना राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

 


Protected Content

Play sound