जळगाव प्रतिनिधी । नवनियुक्त जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी आज दुपारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या जागी अलीकडेच सोलापूर येथील महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती झाली होती. ते सोमवारी पदभार स्वीकारणार असल्याचेही घोषीत करण्यात आले होते. या अनुषंगाने आज दुपारी ढाकणे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. याप्रसंगी मावळते जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे अविनाश ढाकणे यांना सोपविली.