पहूर येथे सरासरी ६६.३२ % मतदान

पहूर-लाईव्ह ट्रेंड न्युज प्रतिनिधी | १३ मे रोजी लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात रावेर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक झाली. त्यात सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून आला. जामनेर तालुक्यातील पहूर मध्ये एकूण १७ केंद्र होती त्यात एकूण १७३९१ पैकी ११५३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.
पहुर येथे ६६.३२% मतदान होऊन मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडली गेली. गेल्या वेळेच्या मतदानापेक्षा ह्यावेळी मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून आले.

Protected Content