जळगावात भरधाव अॉटो रिक्षाची मोटारसायकलला धडक : दोन ठार

vivek nannvare

जळगाव, प्रतिनिधी | शहरात राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव अॉटो रिक्षाने मोटार सायकलला दिलेल्या जोरदार धडकेत दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. घटनास्थळी नागरिक आणि मृतांच्या नातलगांची गर्दी झाली आहे. जिल्हापेठ पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

 

अधिक माहिती अशी की, महामार्गावरून बांभोरीकडून शहराकडे मोटार सायकलने निघालेल्या विवेक उर्फ विक्की पंढरीनाथ नन्नवरे (वय ३१) व हेमंत चंद्रहास ललवाणी (वय ३४) या दोघा तरुणांचा समोरून शहराकडून येणाऱ्या एका भरधाव अॉटो रिक्षाने मोटार सायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात महामार्गावर पोद्दार हायस्कूल जवळील मराठा मटन हॉटेलजवळ आज (दि.१०) सायंकाळी झाला.
मृत विवेक हा जळगावात एका खासगी कंपनीत तर हेमंत हा बांभोरी येथे जैन पाईप कंपनीत नोकरीस आहेत. विवेकच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील व भाऊ-बहिण असा परिवार आहे. तर हेमंतच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे.

Protected Content