जळगाव (प्रतिनिधी) एरंडोलचे उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांच्यासह टाकरखेडा, धारागीर, ताडे येथील तलाठी यांच्या पथकाने जप्त केलेल्या अवैध वाळु साठ्याचा लिलाव 6 जानेवारी रोजी लिलाव होणार आहे.
एरंडोलचे उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांच्यासह टाकरखेडा, धारागीर, ताडे येथील तलाठी यांच्या पथकाने मौजे टाकरखेडा येथे गिरणा नदी व परिसर गट नं. 1 मध्ये अवैध गौणखनिज तपासणी दौरा केला असता जैन रोपवाटीकासमोर मारोती मंदीर (जुने) जवळ, जुने गावठाण गट नं. 1 मध्ये अवैध अंदाजे 30 ब्रास वाळुचा साठा आढळून आला होता. या अवैध वाळु साठ्याचा लिलाव जैन रोपवाटीकासमोर, मारोती मंदीर (जुने) जवळ जूने गावठाण गट नं. 1 या ठिकाणी सोमवार, दिनांक 6 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता ठेवण्यात आलेला आहे. यासाठी एस. पी. शिरसाठ, नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय, एरंडोल यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे. असे उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग, एरंडोल, जि.जळगाव विनय गोसावी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.