जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील सुनसगाव येथील रहिवाशी अतुल संजय पवार हा दि. 1 नोव्हेंबर रोजी आपल्या मित्रांसोबत येथील वाघूर नदीत पोहण्यासाठी गेला होता. यावेळी अतूलचा पाय घसरल्याने त्याचा नदी पात्रात तोल गेला. त्याला शोधण्यासाठी एनडीआरएफ व पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या पथकानेही खोल पाण्यात जाऊन शोध घेण्याचा आजवर प्रयत्न करत असून अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील सुनसगाव येथील रहिवाशी अतुल संजय पवार (वय- 17), चेतन नारायण ईधाटे (वय-17) आणि सागर नाना ईधाटे (वय-20) हे तिघेजण नदीवर पोहण्यासाठी गेले होते. मात्र नदीमध्ये पोहण्या आधीच अतुल पवार याचा पाय घसरल्याने तोल जाऊन तो पाण्यात पडला. हे दृष्य पाहताच सोबत असलेल्या दोघ मित्रांनी अतूलला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. परिसरातील उपस्थितीत लोकांनी वेळेचा विलंब न करता पाण्यात जाऊन सागर व चेतन यांना पाण्यातून बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच अतुलचे वडील संजय भगवान पवार यांनीही पाण्यात बुडी मारून मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तेही बुडु लागल्याचे दिसताच आजु-बाजुच्या लोकांनी त्यांना पाण्याच्या बाहेर काढले. दि.3 आणि आज आपत्ती व्यवस्थापनाच्या व पट्टीच्या पोहणारे भोई समाजाच्या तरूणांनी बोट व आवश्यक साहित्यसोबत घेऊन शोध घेत असून आजवर अतुलचा शोध लागलेला नाही आहे. त्यामुळे परीसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. या ह्दयद्रावक घटनेमुळे गावात चिंतेचे वातावरण पसरले असून अतुलचा जीव वाचावा, यासाठी प्रार्थना केली जात आहे.