अतुल पाटील कोरोना पॉझिटिव्ह

यावल प्रतिनिधी । शहरात आज झालेल्या ॲन्टीजन तपासणीत येथील नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते अतुल पाटील यांचा कोरोना अहवाल हा पॉझीटीव्ह आला असून ही माहीती त्यांनी स्वता:हुन पत्रकारांना दिली आहे.

दरम्यान, कोरोना विषाणु संसर्गाचा प्रादुर्भाव शहरात व तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात वेगाने वाढतांना दिसुन येत असुन मागील चौवीस तासात नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या २९३ कोरोना ॲन्टीजन तपासणी अहवालात १७ जण हे पॉझीटीव्ह आले असुन २७७ जणांचा अहवाल हा निगेटीव्ह आला. 

अतुल पाटील ते सद्या ते त्यांच्या निवासस्थानीच ते होम क्वारेंटाईन झाले असुन त्यांनी त्यांच्या संपर्कातील आलेल्यांनी काळजीपुर्वक आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे सांगीतले. नागरीकांनी अत्यंत आवश्यक काम असेल तरच घराबाहेर निघावे, अन्यथा घरातच सुरक्षीत रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान आज यावल नगर परिषदचे कार्यालयीन अधिक्षक विजय बढे, आरोग्य अधिकारी शिवानंद कानडे, रवीन्द्र काटकर यांच्या पथकाने व यावल ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ बी बी बारेला व तंत्रज्ञ नानासाहेब घोडके यांनी केलेल्या कोरोना चाचणीत कोरपावलीची ६ ६ वर्षीय महीला व ३४ वर्षीय युवकाचा समावेश असुन सातोद येथील एक ५० वर्षीय व ४५ वर्षीय व्यक्तिचा तर सांगवी येथील एक ६३ वर्षीय व ५२ वर्षाच्या व्यक्तिचा तसेच ५५ वर्षीय एका जणांचा समावेश असुन टाकरखेडा येथील एक २१ वर्षाच्या आणी एक १९ वर्षाच्या तरूणाचा पॉझीटीव्ह रुग्णांमध्ये समावेश आहे. 

 

 

 

 

 

 

 

Protected Content