रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बुरऱ्हानपुर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर खानापूर ते चोरवड दरम्यान मोठमोठे खड्डे पडले होते. याबाबतची लाईव्ह ट्रेंड्स न्युजने काल बातमी प्रसिद्ध केली होती. याची दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतली असून आज सकाळपासून खानापूर ते चोरवड दरम्यान खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी देखील या महामार्गाच्या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खड्डे दुरुस्ती व महामार्ग रावेर मार्गे नेण्याची विनंती केली आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळत आहे. खड्ड्यांमुळे अनेक अपघात होण्याची शक्यता होती, ती आता कमी झाली आहे.
खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाल्याने वाहनधारकांकडून समाधान व्यक्त केले जात असून त्यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्युजचे खड्ड्यांबाबत बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल आभार मानले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वेळेवर कार्यवाही केल्यामुळे अपघातांची संभाव्यता कमी झाली आहे आणि प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे. यानंतर, महामार्गावर अधिक चांगल्या देखरेखीसाठी व तत्पर दुरुस्ती कार्यवाहीसाठी स्थानिक प्रशासन व नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत देखील काही नागरिकांनी व्यक्त केले आहे.