तलाठ्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; संघटनेतर्फे तीव्र निषेध

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील परसाडे गाव शिवारात वाळु माफीयास पकडण्यास गेलेल्या तलाठी आणी कोतवाल यांच्या अंगावर ट्रॅक्टर चालवुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या भ्याड हल्यातून सुदैवाने ते बचावले. या निंदनिय घटनेचा यावल तालुका तलाठी संघाच्या वतीने तीव्र निषेध नोंदवून संबंधित वाळु माफीयांवर कडक कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार जितेंद्र कुवर यांना आज (दि.१ सप्टेंबर) रोजी यावल तालुका तलाठी संघाच्या वतीने देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दिनांक ३१ ऑगस्ट रोजी परसाडे तालुका यावल येथे तलाठी म्हणुन कार्यरत असलेले समीर तडवी आणि कोतवाल अय्युब तडवी हे दोघ कर्मचारी कार्यालयात कर्तव्यावर असतांना परसाडे तलाठी कार्यालयासमोरून एक ट्रॅक्टर विनापरवाना वाळु वाहकतुक करतांना आढळुन आले असता तहसीलदार यांच्या आदेशान्वये ट्रॅक्टर मालकाकडुन वाहतुकीचा परवाना आहे किंवा नाही याची चौकशी करणे कामी तलाठी समीर तडवी आणी कोतवाल अय्युब तडवी या दोघांनी त्यांच्या कडील दुचाकीवरून त्या वाळुची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरचा आपले जिव धोक्यात घालुन पाठलाग करून थांबविले व परवाना आहे.

किंवा नाही याची चौकशी करण्याचा प्रयत्न करीत असतांना मागील बाजुने एका मोटरसायकलवर ट्रॅक्टरचा मालक आणी त्याच्या मागे बसलेला एक व्यक्तियांनी सदरच्या वाळु वाहतुक करणाऱ्या चालकास पळवुन जाण्याचा इशारा केला व ट्रॅक्टर चालकाने तलाठी समीर तडवी व कोतवाल अय्युब तडवी हे दोघही महसुल कर्मचारी ट्रॅक्टरच्या पुढील चाका जवळ उभे असतांना कोणताही विचार न करता यांना ट्रॅक्टर व मोटरसायकलने धक्का मारून घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान या घटनेत तलाठी आणि कोतवाल यांना किरकोळ इजा झाली असुन, या संदर्भात ट्रॅक्टरच्या मालकाने तलाठी समीर तडवी यांच्या मोटरसायकलसमोर आपले वाहन उभे करून शासकीय कामात अळथळा निर्माण केला या घटनेचा तलाठी संघाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असुन अशा प्रकारे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई अशी मागणीचे निवेदन तहसीलदार जितेन्द्र कुवर यांना यावल तालुका तलाठी संघाच्या वतीने देण्यात आले.

या निवेदनावर निवासी नायब तहसीलदार आर के पवार , नायब तहसीलदार आर डी पाटील , जे डी बंगाळे , सचिन जगताप , शरद सुर्यवंशी, लिना राणे, के. झेड. सुचिता देशभ्रतार , हेमा सांगोळे सरदार, एन जे धांडे , के के तायडे , मिलींद देवरे , तलाठी संघाचे तालुका अध्यक्ष दिपक एच गवई , सचिव जी डी भगत आदी यावल तालुकात तलाठी संघाचे पदाधिकारी यांच्या स्वाक्षरी आहे.

 

Protected Content