घराचे शटर उचकावून दोन मोटारसायकली चोरी करण्याचा प्रयत्न; एकाला अटक

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नागसेन नगरातील घराचे शटर उचकावून दोन मोटारसायकली चोरी करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला पोलीसांनी रविवारी ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी पहाटे साडेचार वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्याला अटक करण्यात आली आहे. दिपक लक्ष्मण तरटे रा. नागसेन, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विजय सुधाकर सोनार वय ५२ रा. नागसेन नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास विजय सोनार हे सर्वजण झोपलेले असतार संशयित आरोपी दिपक तरटे हा घराचे शटर उचकावून आत ठेवलेले दोन मोटारसायकली चोरून नेण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी विजय सोनार यांना जाग आली. त्यांनी त्यांला जागेवरच पकडले व एमआयडीसी पोलीसांच्या स्वाधिन केले. दरम्यान माझ्यावर केस केली तर तुला पाहून घेईल अशी धमकी दिली. याप्रकरणी पहाटे ४.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव हे करीत आहे.

Protected Content