मुक्ताईनगर येथे डीपीजवळ फटाक्यांची दुकाने थाटण्याचा घाट

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील  मुख्य प्रवर्तन चौकात ११ केव्ही व ३३ केव्ही इलेक्ट्रिक तारांसह इलेक्ट्रिक रोहित्राजवळ फटाके दुकान थाटण्यात येत असल्याने भविष्यातील होणाऱ्या दुर्घटना घडू नये याकरिता उपविभागीय अधिकारी भुसावळ यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जसवंतसिंग बुधेसिंग पवार व उमेश ज्ञानेश्वर बाविस्कर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की,   मुक्ताईनगर हे आदिशक्ती संत मुताईची तिर्थक्षेत्र भूमी  असल्याने आदिशक्ती मुक्ताई च्या दर्शनासाठी लाखो भाविक दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर येत असतात. तसेच शहरातील मुख्य प्रवर्तन चौक असल्याने प्रवासी देखील याच ठिकाणी उतरत असतात. त्यामुळे येथे पोलीस प्रशासनाची नेहमी दमछाक होत असते. त्यातच नुकतेच मुक्ताईनगर शहरात काही सेन्सेटिव्ह घटना घडल्याने हे शहर संवेदनशील झालेले आहे. त्यातच पूजा साहित्य विक्रीसाठी हाथगाडीवर येथे दुकाने लागत असतात. त्यामुळे या काळात येथे प्रचंड गर्दी होत असते. दरम्यान, या प्रवर्तन चौकात उद्यानासमोरील महिला व पुरुषांचे शौचालय असून या शौचालय जवळ पूर्ण शहराची विद्युत जोडणीचे रोहित्र (D.P.) आहे. तसेच याच ठिकाणी वरील भागात ११ केव्ही व ३३ केव्ही क्षमतेचे विद्युत तारा गेल्याने या ठिकाणी शाॅर्ट सर्किट होत असते. यातून अनेक वेळा येथे आग लागण्याच्या घटना घडून उभे झाड जळलेले आहेत. या घटना अनेक वेळा घडत असतात. त्यातच या ठिकाणी काही फटाके विक्रेत्यांकडून फटाक्यांची दुकाने लावण्याच्या घाट रचला जात असून त्यांच्याद्वारा टेंट उभारला जात आहे. त्यामुळे येथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी फटाक्यांची दुकाने लावण्यात येवू नये अन्यथा जीवित व वित्त हानी होण्याची दाट शक्यता असल्याने उपविभागीय अधिकारी यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Protected Content