जळगाव प्रतिनिधी । शिवकॉलनी परिसरातील असलेल्या एसबीआय बँकेचे एटीएम फोडणाचा प्रयत्न उघडकीला आला आहे. दरम्यान एमटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील शिवकॉलनी येथे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या शाखेबाहेर असलेल्या एटीएम मध्ये १२ जून रोजीच्या पहाटे २ वाजून ४८ मिनीटांनी डोक्यात हेल्मेट घालून अज्ञात चोरटा एटीएमच्या कॅबिनमध्ये शिरला. नंतर त्याने पिशवीतून स्प्रे काढून थेट एटीएम मधील दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर मारला. त्यामुळे सीसीटीव्हीतून काहीही दिसून येत नाही. चोरट्योनी एटीएममध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात एका पोलीस कॉन्स्टेबल अतूल महाजन यांनी बँक मॅनेजर दिव्येश अर्जून चौधरी यांना फोनद्वारे एटीएम फोडण्याची माहिती दिली. बँक मॅनेजर दिव्येश चौधरी तत्काळ घडनास्थळी दाखल झाले. त्यांची एटीएमची पाहणी केली असता त्यांना कॅशडिपॉझीट मशिनचा सीडीएमचा दरवाजा तोडलेला होता. तर सीडीएम मशीनमधील पत्रा तोडून नुकसान केलेले दिसून आले. सुदैवाने एटीएममधील रोकड जसीच्या तशी होती. बँक मॅनेजर दिव्येश चौधरी यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अजित पाटील करीत आहे.