जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यासत गुजरात राज्यातून दुचाकीची चोरी करणाऱ्या संशयिताला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी ३० जुलै रोजी दुपारी १२ वाजता सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहे. पुढील कारवाईसाठी त्याला बोदवड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सागर रामदास कोळी (रा. श्रीराम नगर, मुक्ताईनगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
जिल्ह्यात वेगवेगळ्या भागातून चोरीला गेलेल्या दुचाकींचा शोध सुरू असताना सुरू मुक्ताईनगर येथील सागर रामदास कोळी हा चोरीच्या दुचाकी वापरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोहेका दीपक पाटील, कमलाकर बागुल, अनिल देशमुख, महेश महाजन, पोलिस नाईक किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, मोतीलाल चौधरी यांचे पथक तयार केले व कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने सागर रामदास कोळी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बोदवड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दुचाकीसह मुक्ताईनगर, मलकापूर शहर पोलिस ठाणे, सुरत (गुजरात) खटोदरा पोलिस ठाणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी दाखल गुन्ह्यातील एक लाख १० हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी ताब्यात घेतल्या. तर सागर याला बोदवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.