जळगावात तरुणावर प्राणघातक हल्ला : प्रकृती गंभीर

attack on youth

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील दादावाडी परिसरात दोन तरुणांनी वाळू व्यावसायिक अनिल एकनाथ नन्नवरे (वय २७) या तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज (दि.२१) दुपारी १२.०० वाजेच्या सुमारास घडली. जखमी अनिल याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

 

दरम्यान, अद्याप हल्ल्याचे कारण समजू शकलेले नाही. दोन्ही हल्लेखोरांनी चॉपर आणि तलवारीच्या साह्याने वार करून त्याला जखमी केले आहे.
त्याच्यावर उपचार सुरु असलेल्या खाजगी रुग्णालयात नातेवाईक व मित्रमंडळी यांच्यासह पोलिसांचीही गर्दी झाली आहे. या हल्ल्यामागे संशयित आरोपी विशाल पाटील व महेश उर्फ पाटील हे असल्याचे कळले असून दीड वर्षापूर्वीच्या जुन्या वादातून हा हल्ला झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Protected Content