Home Cities बोदवड शिक्षिकेवर चाकूने हल्ला करून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

शिक्षिकेवर चाकूने हल्ला करून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

0
26
crime-2

बोदवड प्रतिनिधी । येथील आयटीआयमध्ये शिक्षकाने शिक्षिकेवर चाकूने हल्ला केल्यानंतर स्वत:वर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, तालुक्यातील नाडगाव येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आहे. यातील के.ई. पाटील या शिक्षकाने एका शिक्षिकेवर चाकू हल्ला केला. यानंतर त्याने स्वत:च्या पोटात चाकू मारून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात दोन्ही जण जखमी झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ही घटना प्रेम प्रकरणातून घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यातील जखमी शिक्षक व शिक्षिकेवर उपचार सुरू असून हा प्रकार प्रेम प्रकरणातून घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ( सविस्तर वृत्त लवकरच )


Protected Content

Play sound