Home क्राईम जळगावात कौटुंबिक वादातून एकावर कोयत्याने हल्ला

जळगावात कौटुंबिक वादातून एकावर कोयत्याने हल्ला

29ecd262 0c4d 47fd 9a16 26efd01fb834
29ecd262 0c4d 47fd 9a16 26efd01fb834

29ecd262 0c4d 47fd 9a16 26efd01fb834

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील वाल्मिक नगर जवळ आज दुपारी कौटुंबिक वादातून एकावर कोयत्याने हल्ला चढविल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.

 

या संदर्भात अधिक असे की, वैशाली सौरभ चौधरी (रा.दशरथ नगर) या मागील चार महिन्यापासून आपल्या पतीसोबत असलेल्या मतभेदामुळे पतीचे घर सोडून भाऊकडे राहत आहेत. आज दुपारी वैशाली या आपला भाऊ विक्की यशवंत पाटील याच्यासोबत दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होत्या. याच वेळी सौरभ चौधरी याने दोन अनोळखी माणसांसोबत दोघांना वाल्मिक नगर जवळ थांबविले. त्यानंतर माझ्या पत्नीला घरी का पाठवत नाही?, यावरून विक्कीसोबत वाद घालायला सुरुवात केली. थोड्याच वेळात सौरभने कोयत्याने विक्कीवर हल्ला चढविला. या हल्ल्यात विक्कीच्या दोघं हातांना गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, घटनास्थळावर सौरभ चौधरी सोबत दोन अनोळखी तरुण देखील उपस्थित होते. जखमी विक्कीला उचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound