Home क्राईम भुसावळातील जाममोहल्ल्यात दोन तरूणांवर चाकू हल्ला

भुसावळातील जाममोहल्ल्यात दोन तरूणांवर चाकू हल्ला

0
34

भुसावळ प्रतिनिधी । शहरातल्या जाममोहल्ला भागातील दोन तरूणांवर चाकू हल्ला करण्यात आला असून यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जाममोहल्ल्यात मोहंमद अलाम इस्माईल व फरदीनखान शकील खान हे तरूण गप्पा करत उभे होते. यातच ताहेर शेख आझाद शेख याच्यासोबत त्यांचे पाहण्याच्या कारणावरून वाद झाले. यात ताहेर शेख याने अचानक या दोघांवर चाकूने सपासप वार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात मोहंमद अलाम इस्माईल व फरदीनखान शकील खान हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी एका तरूणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आज रात्री घडलेल्या या आकस्मिक प्रकारामुळे जाममोहल्ल्यासह परिसरात खळबळ उडाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound