Home क्राईम जातीवाचक शिविगाळप्रकरणी तरूणावर गुन्हा दाखल

जातीवाचक शिविगाळप्रकरणी तरूणावर गुन्हा दाखल


phpThumb generated thumbnail

पहूर ता. जामनेर (वार्ताहर)। जातीय वाचक शिवीगाळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी पहूर पेठ येथील एका तरूणाविरूध्द ॲट्रासिटी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहूरपेठ येथील रहिवासी सचिन शिवदास मोरे हा त्याच्या मित्रांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरच्या गेटजवळ बसलेला होता. दरम्यान विशाल सुभाष पाटील त्या ठिकाणी येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरून बसलेल्या युवकांना जातीयवाचक शिवीगाळ केल्याची घटना मंगळवार रोजी रात्री 10.30 च्या सुमारास घडली. या प्रकरणी सचिन मोरे याच्या फिर्यादीवरून विशाल पाटील विरुद्ध अँट्रासिटी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound