पारोळा प्रतिनिधी। घरात एकटी मुलगी असताना व्यसनाधीन बापाने आपल्या स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर सलग दोन दिवस अत्याचार केल्याची लांच्छनास्पद घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या फिर्यादी वरून बापा विरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कन्हरे ता पारोळा येथे आत्याचारीत बाप रवींद्र शामराव पाटील (पेंटर) हा आपली पत्नी, एक मुलगा व एक मुलगी सह राहतो. सहा महिन्या पूर्वी शालकाचा शालकाचे पिप्री ता. रावेर येथे लग्नासाठी त्याची पत्नी आणि मुलगा हे गावाला गेले होते. घरी पेंटर रवींद्र पाटील व इयत्ता दहावीत शिकणारी 16 वर्ष वयाची मुलगी हे दोघेच घरी होते. त्या दिवशी रवींद्र पाटील हा दारू पिऊन रात्री घरी आला. रात्री 11 वाजेच्या सुमारास त्याने खाटेवर झोपलेली मूलगीचा अंगावर हात ठेवल्याने तिला जाग आली. त्यानंतर त्याने मुलीला धमकी देऊन शरीर संबंध केले. व मुलीला कोणाला याबाबत सांगितले तर तुला जीवे मारून टाकीन व आत्महत्या करून घेइल अशी धमकी दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा दुपारी 1 च्या सुमारास दारू पिऊन घरी आले. व घराचे पुढचे मागचे दरवाजे बंद करून पुन्हा बळजबरीने संबंध केले.
जीवे मारण्याची धमकी दिली. त्या दिवशी आई व भाऊ रात्री घरी आले. परन्तु धमकी मुळे मूलगीने त्यांना घटना सांगीतली नाही. घटनेच्या दोन महिने नंतर मुलीला मासिक पाळी आली नाही. म्हणून आई व वडील यांनी तिला पारोळा येथे दवाखान्यात आणले. डॉक्टरांनी तपासून रक्त कमी असल्यामुळे पाळी आली नसेल असे सांगून गोळ्या औषधी दिल्या. परंतु त्यानंतरही मासिक पाळी आली नाही. म्हणून तिला काल आई वडील यांनी त्याच डॉक्टर कडे तपासणीसाठी आणले. डॉक्टरांनी तपासून ती गरोदर असल्याचे सांगितले. त्यानंतर पारोळ्यात सोनाग्राफी केली असता ती सहा महिन्यांची गरोदर असल्याचे समजले. या नंतर मुलीने आईला आत्याचार चा सर्व घटनाक्रम सांगितला. समाजात बदनामी होवू नये म्हणून आईने मुलीला हिरे वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे गर्भपात करण्यासाठी भरती केले. दरम्यान मुलीने दिलेल्या फिर्यादी वरून वडिलांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सपोनि रवींद्र बागुल करीत आहेत.