महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत अकोला परिमंडलाचे खेळाडू यशस्वी


बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बारामती येथे नुकत्याच पार पडलेल्या महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेत अकोला – अमरावती परिमंडलाच्या संयुक्त संघातील पॉवलिफ्टींग,टेबल टेनिस,कुस्ती, या क्रीडा प्रकारांत ५ सुवर्ण आणि ब्रीज आणि शरीर सौष्ठव या क्रिडा प्रकारात २ रजत अशी एकुण ७ पदके पटकावली आहेत.अकोला परिमंडलात कार्यरत पदक विजेत्या सर्व कर्मचारी खेळाडूंचा मुख्य अभियंता सुहास रंगारी यांनी कौतूक करत अभिनंदन केले. यावेळी अधीक्षक अभियंता(प्र.)अजितपालसिंह दिनोरे,सहाय्यक महाव्यवस्थापक मनिषकुमार भोपळे,उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर,वरीष्ठ व्यवस्थापक राहूल चोधरी उपस्थित होते.

बारामती येथे विद्या प्रतिष्ठान संकुलात ( दि. ५ ते ८ फेब्रु)पार पडलेल्या महावितरणच्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेकरीता २३ क्रिडा प्रकारात अकोला- अमरावती संयुक्त परिमंडलातून वैयक्तीक व सांघिक खेळासाठी महिला व पुरूष गटातून एकुण १५२ खेळाडू सहभागी झाले होते.
अकोला येथे कार्यरत असलेले तंत्रज्ञ प्रवीण तायडे यांनी पॉवर लिफ्टींग या क्रिडा प्रकारात ९३ किलो वजनी गटात आपली छाप सोडत सुवर्ण मिळविले,तर याच क्रिडा प्रकारात अमरावती येथे कार्यरत असणारा तेजस आबाळे १०५ किलो वजनी गटात सुवर्ण पदाचा मानकरी ठरला.

अकोला येथे कार्यरत असणाऱ्या सहाय्यक अभियंता कोमल पुरोहित,सारिका चव्हाण,तंत्रज्ञ स्वाती जाधव व यवतमाळ येथे कार्यरत असणाऱ्या सहाय्यक अभियंता स्नेहल बडे यांनी यांनी टेबल टेनिसमध्ये संयुक्त कामगीरी दाखवत सांघिक कार्यालय भांडूपवर दणदणीत विजय मिळविला. त्याचसोबत स्नेहल बडे यांनी याच क्रिडा प्रकारात कल्याण-रत्नागीरी संघातील रंजना तीवारी यांना मात देत सुवर्ण पदक मिळविले, यवतमाळ येथे कार्यरत असलेले वरीष्ठ तंत्रज्ञ विनोद गायकवाड यांनी ६१ किलो वजनी गटात कुस्तीच्या अंतीम सामन्यात छत्रपती संभाजीनगर- लातूर – नादेंड परिमंडळातील खेळाडू शरद मोकळे यांच्यावर मात करत सुवर्ण पदक पटकावले, विनोद गायकवाड यांनी सलग तीसऱ्या वर्षी सुवर्ण पदक पटकावले आहे.

याचसोबत महावितरणच्या क्रिडाप्रकारात नव्यानेच सामिल करण्यात आलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत प्रधान तंत्रज्ञ झरीन शेख यांना निसटता पराभव स्विकारत रजत पदकावर समाधान मानावे लागले,तर कार्यकारी अभियंता ब्रजेश गुप्ता,व्यवस्थापक यज्ञेश क्षिरसागर,उपव्यवस्थापक प्रमोद कांबळे,सहाय्यक अनुदेशक विवेक मारोडे,सहाय्यक अनुदेशिक अनुप पंडित व प्रशांत झाडे यांनी ब्रीज या सांघिक क्रिडाप्रकारात रजत पदक मिळविले. राज्यस्तरीय खेळाकरीता परिमंडल प्रशिक्षक आणि समन्वयकाची भूमिका उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर यांनी पार पाडली.