यावल येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केंद्र सरकारविरोधात आंदोलन

यावल प्रतिनिधी । केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात आज (दि.२७) सकाळी १० वाजता यावल शहरातील भुसावळ टी पाईंटवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले.

यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा जिल्हा परिषद काँग्रेस गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे व व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा मुकेश येवले, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग  पाटील, नगरसेवक सैय्यद युनुस सेय्यद युसुफ , राष्ट्वादी युवक काँग्रेसचे अॅड देवकांत पाटील, नगरसेवक असलम शेख नबी, नगरसेवक समीर शेख मोमीन , नगरसेवक  गुलाम रसुल ,काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान ,कॉंग्रेस सेवा फाऊंडेशनचे जलील पटेल , हाजी गफ्फार शाह , कोरपावली सरपंच विलास अडकमोल, वढोदे सरपंच संदीप सोनवणे, काँग्रेस आदीवासी सेलचे बशीर तडवी, विक्की गजरे , बापु जासुद,  सत्तार तडवी , नईम शेख , अनिल जंजाळे , प्रदीप पाटील , प्रविण साळुंके, निवृती धांडे , विनोद पाटील , कामराज घारू, करीम मन्यार , यांनी मोदी सरकार वर टीका केली.

यावल शहरातील भुसावळ टी पॉइंटवर या आंदोलनामुळे अर्धातास रहदारी खोळंबली होती. यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेने सह इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून या ठिकाणी मात्र शिवसेनेचा एकही कार्यकर्ता यावल मधील आंदोलनास उपस्थित नव्हता, असे पहावयास मिळाले.

शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील व तालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे आणि शहर अध्यक्ष जगदीश कवडीवाले यांनी आज राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या रास्ता रोको व भारत बंदच्या आंदोलना मात्र राज्यातील महाविकास आघाडी शासनाचा घटक पक्ष यात दिसुन आला नसल्याने पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उतर देतांना शिवसेना पदाधिकारी यांनी दोघ कॉंग्रेस पक्षाच्या अशा प्रकारच्या वागणुकीबाबत खंत व्यक्त केली.

स्थानिक आमदार यांनी व काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे शिवसेनेला सोबत घेऊन चालण्यासाठी कोणत्याही कार्यक्रमाबाबत कळवत नाही? किंवा शिवसेनेला विश्वासात घेत नाही, राज्यात शिवसेनेसह पक्षांची आघाडीचे शासन आहे मात्र यावल येथे नुकताच ग्रामीण रुग्णालयांमध्ये आमदार  शिरीष चौधरी यांच्या कडून अत्याधुनिक रुग्णवाहीकेचे लोकार्पणाचे कार्यक्रमा प्रसंगी सुद्धा शिवसेनेला डावलण्यात आले त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते काँग्रेस व राष्ट्रवादी च्या कार्यपद्धतीबद्दल नाराज असून आगामी  काळात होवु घातलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना एकला चलो रीची भूमिका निभावते की काय ?असे चित्र यावल तालुक्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेने पक्षाची भुमिका ही नेहमी आंदोलन करण्याची भूमिका असते त्यामुळे जर काँग्रेस-राष्ट्रवादीला वाटत असेल की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घ्यायचं नाही तर आम्ही स्वतंत्र आंदोलन करू शकतो, शेतकरी असो किंवा नागरीकांचे प्रश्न असो यासाठी आंदोलन करणे हा शिवसेनेचा स्वभावच आहे.

तसेच शिवसेनेकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. या समन्यवया अभावी गोंधळलेल्या वातावरणात मुळे आम्ही जर काही वेगळी भूमिका घेतली तर स्थानिक आमदार व काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे जिल्ह्याचे पालकमंत्र्यांकडे सेनेची तक्रार करतात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील आणि रावेर लोकसभा शिवसेना सहसंपर्कप्रमुख माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आपण आघाडी असल्यामुळे सोबत काम करूया असे ते नेहमी आम्हाला सूचना करतात यावल तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते या आदेशाचे पालन करते मात्र काँग्रेस राष्ट्रवादी कडून तसा आम्हाला दुजाभाव केला जातो  यापुढे  शिवसेना असं कुठल्याही खपवून घेणार नाही असे शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे आणि शिवसेना यावल शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांनी ” लाईव्ह ट्रेंड न्युज “शी बोलताना सांगितले.

 

 

Protected Content