जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापूरा येथील गौतम नगरात मित्रांसोबत बोलत असलेल्या तरूणाला काहीही कारण नसतांना तीन जणांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी तीन जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनराज उर्फ करण दिपक अहिरे (वय-१६) रा. गौतम नगर तांबापूरा हा तरूण बुधवार १४ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आपल्या मित्रांसह गल्लीत गप्पा मारत होता. त्यावेळी गल्लीतील अरबाज (पुर्ण नाव माहित नाही) हा आला. धनराज अहिरे हा मित्रांशी बोलत असतांना अचानकपणे येवून काहीही कारण नसतांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्यावेळी अरबाज सोबत असलेले साजिद आणि अच्चु (पुर्ण नाव माहिती नाही) यांनी देखील मारहाण केली. यातील अरबाज म्हणाला की, ‘यापुढे जोर जोरात बोलायचे नाही, बोलले तर पुन्हा मारू’ अशी धमकी दिली. यात धनराज अहीरे हा जखमी झाला. जखमी अवस्थेत एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तीन जणांविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारी वरून एमआयडीसी पोलीसात तीन जणांवर अदखपात्र गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पो.कॉ अल्ताफ पठाण करीत आहे.