निमगावातील आ. अमोल जावळेंनी गोशाळेला भेट देत केले गोपूजन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील निमगाव येथील गोशाळेला मंगळवारी आमदार अमोल जावळे यांनी भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी प्रारंभी गोपुजन केले. तसेच गोशाळेतील विविध अडी अडचणी व समस्या जाणुन घेतल्या आणी शासनस्तरावर गोशाळेस आवश्यक त्या मदतीचे आश्वासन त्यांनी दिले.

निमगाव ता.यावल येथे गोवर्धन गोशाळा आहे या गोशाळेत मंगळवारी रावेर यावल विधानसभा मतदार संघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी भेट दिली. याप्रसंगी आमदार जावळे यांनी गोमातेचे विधिवत पूजा करून गाईंना गोग्रास खाऊ घातला. गोमातेचा जतन, रक्षण व संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन होते असे प्रतिपादन आमदार अमोल जावळे यांनी केले व गोसंवर्धन व रक्षणाची शाश्वती दिली. तसेच गोशाळेतील गाईंच्या सेवेचे व संगोपनाचे विशेष कौतुक केले.

या भेटीदरम्यान गोशाळेचे अध्यक्ष गोपाळ कोळी, उपाध्यक्ष अरुण तावडे,सचिव चेतना कोळी,सदस्य बाळू कोळी, लिलाबाई कोळी, विजया तावडे ,सुरज सोनवणे ,सुरज राजपूत  संचित कोळी महाराज, संजय तावडे, जगदीश कोळी ,भोजराज ढाके, साई चव्हाण ,यश वारके, विनायक बारी, पंकज चौधरी, अभिषेक सोनवणे, कृष्णा पाटील, गिरीश बारी, प्रकाश कोळी ,सविता कोळी, छाया पाटील, अलका कोळी, कल्पना पाटील व सर्व ग्रामस्थ निमगाव व टेंभी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार डॉ. नरेंद्र महाले यांनी मानले. गोशाळा सुरळीत चालली पाहिजे, गोमातेचे रक्षण सह त्यांना निरोगी आयुष्या करीता गोशाळेत विविध अडचणी येत असतात तेव्हा शासन स्तरावर गोशांळांना विविध अनुदान तसेच विविध मदतीकरीता आपण पाठपुरावा करू असे अश्वासन आमदार अमोल जावळे यांनी दिले आहे.

Protected Content