भुसावळ, प्रतिनिधी | शहरातील महाराणा प्रताप विद्यालयात येथील बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पो.नि. भागवत यांनी विद्यार्थ्यांना जनजागृतीपर मार्गदर्शन केले.
यावेळी श्री. भागवत यांनी विद्यार्थ्यांना सद्गुणांची जोपासना कशी करावी, जेणेकरून वाममार्गाला आपले पाऊल पडू नये. याविषयी माहिती दिली. तसेच पोलिस हे समाजाच्या जवळचा मित्र आहेत, असा विश्वासही दिला. विद्यार्थ्यांशी चर्चा करताना आधुनिक मोबाईल व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस यांचा योग्य वापर कसा करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. शारीरिक खेळाविषयी त्यांनी मुलांना खूप खेळा खेळातून आरोग्य कमवा, असे सांगितले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिंदे यांनी भागवत यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. श्री.पाटील यांनी सूत्रसंचालन तर श्री.सैतवाल आभार प्रदर्शन यांनी केले.