आमोदा येथे अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आमोदा येथे अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी तालुका पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तालुका पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील आमोदा येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आईवडीलांसह राहते. आईवडील हातमजूरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. २४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी अमोल आबाजी गायकवाड रा. आमोदा ता. जळगाव याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अल्पवयीन मुलीच्या वडीलांना तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अमोल गायकवाड याच्या विरोधात तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ इश्वर लोखंडे करीत आहे. 

 

Protected Content