Home राजकीय मानलं पवार साहेब आपल्याला : निलेश राणेंची खोचक टिका

मानलं पवार साहेब आपल्याला : निलेश राणेंची खोचक टिका

0
58

मुंबई । शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या मारलेल्या टोल्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी आज उध्दव ठाकरे यांची खिल्ली उडवत पवारांचे कौतुक केले आहे.

राज्यात एकहाती शिवसेनेचा भगवा फडकवण्यास सज्ज राहा, आत्तापासूनच तयारीला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले होते. या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता. गेल्या ३० वर्षांपासून मी शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकत आलो आहे. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं.

यावरून निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, मानलं पवार साहेब आपल्याला.. महिनाभर कौतुक करता आणि एका दिवसात वर्षभराची उतरून टाकता. पवार साहेबांनी एका वाक्यात कान टोचले, अशी टीका निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

 


Protected Content

Play sound