जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील लेंडी नाल्याजवळ घर खाली करण्याच्या कारणावरून महिलेला अश्लिल शिवीगाळ व दमदाटी करत धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात बुधवार १३ मार्च रोजी दुपारी ४ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनीपेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील लेंडी नाला जवळ ज्योती अशोक साळुंखे वय-३५ या महिला आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्याला आहे. घर खाली करण्यासंदर्भात शेरा उर्फ शेख हरी सपकाळे रा. वाल्मिक नगर, जळगाव महिलेशी वाद घालत होता. शनिवारी ९ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता घर खाली कर असे सांगून महिलेला अश्लिल शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच धमकी देखील दिली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने बुधवारी १३ मार्च रोजी दुपारी ४ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात शेरा उर्फ शेख हरी सपकाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भागवत शिंदे हे करीत आहे.