यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील गुजरात आणि मध्यप्रदेश अशा दोन राज्यांना महाराष्ट्राशी जोडणाऱ्या बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या महामार्गावर यावल पासुन डांबरीकरणाला सुरूवात झाली असुन,शेकडो वाहन चालकांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे.
यावल तालुक्यातुन जाणाऱ्या व गुजरात आणी मध्यप्रदेश अशा दोन राज्यांना महाराष्ट्र राज्याशी जोडणाऱ्या ब-हाणपुर अंकलेश्वर महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन प्राधिकरण विभागाकडे वर्ग झाल्या नंतर गेल्या वर्षीच या महामार्गावर खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली होती.पंरतु असे असतांना पहिल्याच पावसात महामार्गावरील खड्डे जैसे थे झाले होते.त्यामुळे यावल ते चोपडा दरम्यान प्रवास करताना या मार्गावर अनेक भिषण अपघात होवुन अनेकांनी आपले जिव गमवावे लागले असुन, या महामार्गावर शेकडो वाहन चालकांना आपले जिव धोक्यात घालुन वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत होती.
दरम्यान ब-हाणपुर अंकलेश्वर महामार्ग हा रूंदीकरणासह चारपदरी मंजूर झाला असून,या महामार्गाचे घोंगडे कुठे अडले आहे. दरम्यान सदरच्या या मार्गाच्या चौपदीकरणास सुरूवात होण्यास अजुन किती निरपराध वाहन चालकांना आपले जिव गमवावे लागतील असा यावल रावेर चोपडा तालुक्यातील जनते कडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. या रस्त्याच्या मात्र गंभीर अशा प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी गांर्भीयांने लक्ष देणे अत्यंत गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. सदरच्या या महामार्गाचे काम होईल जेव्हा होईल पंरतु सध्या रस्ता दुरुस्ती व नवीन डांबरीकरण होत असल्याने सध्या तरी वाहन चालकांमध्ये समाधान व्यक्त केले आहे.