जळगाव प्रतिनिधी । शेतात पायी जाणाऱ्या शेतकऱ्याचा अचानक खाली पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, विलास पंढरीनाथ महाजन (वय-45) रा. आसोदा ता.जि.जळगाव हे आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास शेतात गेले. शेतातील पाण्याच्या पाटचारीजवळ त्यांना पायाला ठोकर लागल्याने ते खाली पडले व खाली पडल्यानंतर त्यांना जागीच मृत्यू झाला. नातेवाईकांनी तातडीने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकिय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी संगिता, मुलगा विनोद असा परीवार आहे.