जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जपानमधील प्रमुख बँक असलेल्या मिझुहोचे कामकाज भारतात सुरू झाले असून या बँकेच्या आर्थिक रणनीतीसाठी वय वर्षे ४० च्या आत असलेल्या देशभरातील ४० अष्टपैलूंमध्ये अस्मिता सौरभ पाटील यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि जिंदाल समूहाचे पार्थ जिंदाल यांच्या हस्ते अस्मिता पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
मिझुहो बँक ही जपानमधील प्रमुख बँकांपैकी एक आहे. या बँकेने भारतातदेखील आपले कामकाज सुरू केले आहे. यासाठी कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्हजचे अखिल भारतीय सर्वेक्षण करण्यात आले. यात निराकरणकर्ता, रणनीतीकार आणि अष्टपैलू आणि वय वर्षे ४० च्या आतील अशा ४० जणांची निवड करण्यात आली. गोदावरी फाउंडेशनचे उपाध्यक्ष असलेले सुभाष पाटील यांच्या स्नुषा अस्मिता सौरभ पाटील यांचादेखील समावेश आहे. अस्मिता पाटील ह्या आरसीएफ केमिकल येथे कार्यरत आहेत.
अस्मिता पाटील यांच्या निवडीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली, जिंदाल समूहाचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर पार्थ जिंदाल आणि मिझुहो बँकेचे सीईओ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अस्मिता पाटील यांची निवड ही जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या या निवडीबद्दल श्रीमती गोदावरी पाटील, माजी खा. डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील यांनी कौतुक केले आहे.