जळगाव प्रतिनिधी | माजी नगरसेविका अश्विनी विनोद देशमुख यांना डॉक्टरेट मिळण्यासह नेल्सन मंडेला नोबेल पीस अवॉर्ड मिळाल्याबद्दल आज माजी मंत्री एकनाथराव खडसे व गुलाबराव देवकर यांनी त्यांचा सत्कार केला.
याबाबत वृत्त असे की, माजी नगरसेविका डॉ. सौ अश्विनीताई विनोद देशमुख यांना नुकतेच डॉक्टरेट व नेल्सन मंडेला नोबेल पीस अवॉर्ड २०२१ देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. यानिमित्त आज जळगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथरावजी खडसे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार डॉ गुरुमुख जगवाणी, अशोक पाटील, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ वंदना चौधरी, महिला महानगराध्यक्षा सौ मंगलाताई पाटील, अशोक लाडवंजारी,सुनिल माळी,सौ मिनाक्षीताई चव्हाण,विशाल देशमुख,मनोज वाणी, मुविकोराज कोल्हे,आमित चौधरी,यशवंत पाटील,जावेद शेख यांची उपस्थिती होती.