जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील सुमारे २० कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी संघटना संलग्न असलेल्या जिल्हा मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्ष व कार्यकारिणी निवडीसाठी आज बैठक घेण्यात आली त्यात अध्यक्षपदी अशोक हरनारायण राठी यांची एकमताने निवड करण्यात आली.
कार्यकारिणीत पाच उपाध्यक्षांसह ४२ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वासुदेव बेहडे हे होते. या बैठकीत शासनातर्फे नव्याने लागू करण्यात येत असलेल्या फूड सेफ्टी कायद्याबद्दल येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. मिनिमम सपोर्ट प्राइसला पर्याय ठरणाऱ्या मध्य प्रदेशातील भावांतर योजनेबाबत चर्चा करण्यात आली. सूत्रसंचालन संजय गांधी यांनी केले.
कार्यकारिणी जाहीर
प्रकाश कोठारी (जामनेर), नरेंद्र अग्रवाल (भुसावळ), महेंद्र पाटे (पाचोरा), अरविंद बरडीया (बोदवड), सुरेश येवले (चाळीसगाव), सचिव प्रकाश वाणी (अमळनेर), अतिरिक्त सचिव दीपक महाजन (जळगाव), कार्याध्यक्ष यतीन कोठारी (अमळनेर), सहसचिव किशोर गुजराती (फैजपूर) व अजय अग्रवाल (चोपडा), जनसंपर्क अधिकारी सुनील तापडिया (जळगाव), खजिनदार मनोज पाटील (चाळीसगाव) यांचा समावेश अाहे. तसेच पाच सल्लागार, मार्गदर्शकांची ही निवड करण्यात आली. त्यात भुसावळ येथील राधेश्याम लाहोटी, पाचोरा येथील भरत शेंडे, शशी बियाणी (जळगाव) संजय शहा (कॅट प्रतिनिधी) व अंकलेश ललवाणी (जामनेर) यांचा यात समावेश आहे.