यावल प्रतिनिधी । विरावली तालुका यावल येथील रहिवासी अशोक पाटील यांचे जळगाव येथे दवाखान्यात उपचार सुरु असतांना निधन झाले.
अशोक पाटील यांचा पश्चात मुलगा श्रीकांत पाटील, (मुंबई महापालिका) विवेक पाटील, विकास पाटील सोबत सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. तसेच पाटील हे यशवंत पाटील माजी तालुका सरचिटणीस भारतीय जनता पार्टी यावल तालुका यांचे मोठे बंधु होते. अशोक पाटील यांचे मृत्युनंतर सध्या जगभरात सुरु असलेले कोविड 19 चे वातावरण झाल्याचे बघता डॉक्टर यांचे सल्ल्यानुसार जास्त हट्टाहास न करता कोरोना काळात वारिल तिन्ही मुलांनी आपले दुःख बाजूला सावरुन एक धाडसी निर्णय घेतला. कोणतेही नातेवाईक किंवा गावातील मंडळी यांना न बोलवता वडीलांचे जळगाव येथे अत्यंसंस्कार विधि पार पाडला.