Home Uncategorized अशोक चव्हाण राजीनाम्याच्या तयारीत?

अशोक चव्हाण राजीनाम्याच्या तयारीत?


ashok chavan

मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे नाराज असून ते राजीनाम्याच्या तयारीत असल्याच्या वृत्ताने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात त्यांचीच एक ऑडीओ क्लिप चांगलीच व्हायरल होतेय.

 

चंद्रपूरच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या एका कार्यकर्त्यासोबतच्या फोनवरील संभाषणाची ऑडीओ क्लिप सोशल माध्यमांवर व्हायरल झाली आहे. यामध्ये चंद्रपूरच्या उमेदवारीबद्दल चर्चा सुरु असताना अशोक चव्हाण हे मी स्वतः राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे, असे बोलल्याचा संवाद आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांचे मनोबल राखणे आमचे काम आहे, मी क्लिप ऐकलेली नाही, असे चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound