Home Cities अमळनेर बसअपघातात धरणगाव शिक्षणाविस्ताराधिकारी अशोक बि-हाडे जखमी

बसअपघातात धरणगाव शिक्षणाविस्ताराधिकारी अशोक बि-हाडे जखमी


ashok birhade

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरचे माजी गटशिक्षणाधिकारी तथा धरणगावचे विद्यमान शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षक मित्र अशोक बिऱ्हाडे हे बसअपघातात जखमी झाले आहेत. यात त्यांच्या डोक्याला आणि डाव्या हाताला मार बसला असून सुज आली आहे.

 

शुक्रवारी सकाळी साधारण 8:30 वाजता अमळनेर-चोपडा रोडवर नांद्री (पातोंडा) जवळ बसप्रवास करत असतांना हा अपघात झाला. यात त्यांच्या डोक्याला आणि डाव्या हाताला मार बसला असून सुज आली आहे. आता त्यांची प्रकृती चांगली आहे. श्री. बिऱ्हाडे यांच्या अंगी सामाजिक जाणीव असल्याने अगोदर त्यांनी इतर सहप्रवासी, बस चालक व वाहक यांना धिर दिला. जखमी प्रवासी व बैलगाडी चालक यांना अगोदर दवाखान्यात पाठवून नंतर पातोंडा येथे प्रथमोपचार घेऊन अमळनेर येथे आले. सध्या घरी असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यासाठी सांगितले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound