मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शेलार हे 25 हजार 900 पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले आहेत.
वांद्रे पश्चिम मतदारसंघात कमी मतदानाची नोंद झालेली असतानाही आशिष शेलार यांना आपला गड राखण्यात यश आलं आहे. वांद्रे पश्चिम सारख्या बहुभाषिक मतदारसंघात कोणे एके काळी काँग्रेसची सत्ता होती. मात्र 2014 मध्ये भाजपने खेचून आणलेल्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शेलार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. आशिष शेलार यांच्याविरोधात केवळ तीनच उमेदवार होते. काँग्रेसचे आसिफ जकेरिया शेलारांना कडवी झुंज देतील असं मानलं जात होतं. भाजपला डोकेदुखी ठरणाऱ्या चाळीस जागांमध्ये वांद्रे पश्चिम मतदारसंघाचा समावेश होता. याशिवाय बसप आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते.