जळगाव (प्रतिनिधी) मुक्त पत्रकार, पुरोगामी व बहुजनवादी चळवळीत सक्रिय असलेले सामाजिक कार्यकर्ते अशफाक पिंजारी यांची नुकतीच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शहर अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
८ मार्च,शुक्रवार रोजी सायंकाळी खान्देश मिल कॉम्प्लेक्समधील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव कार्यालयात जळगाव शहर शाखेची नूतन कार्यकारिणी निवडीसाठी जिल्हाध्यक्ष प्रा.डी. एस.कट्यारे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. त्यात सामाजिक कार्यकर्ते अशफाक पिंजारी यांची सर्वानुमते शहरध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी डॉ.विकास निकम, कार्याध्यक्षपदी जितेंद्र धनगर, कायदेविषयक सल्लागारपदी ऍड.विजय शुक्ल, प्रधान सचिवपदी गुरुप्रसाद पाटील,वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प प्रमुखपदी राजेश प्रितम वळवी, विविध उपक्रम कार्यवाहपदी अजित चौधरी तर बुवाबाजी संघर्ष कार्यवाहपदी स्मिता शिरसाळे याचा समावेश आहे. यावेळी समितीचे सर्व क्रियाशील सदस्य प्रा.दिलीप भारंबे, सुरेश खैरनार,विजय लुल्हे, राजेंद्र चौधरी, शिरीष चौधरी व संदीप कुमावत यांची उपस्थित होती. यावेळी निरीक्षक म्हणून ‘मअंनिस’चे जिल्हाअध्यक्ष प्रा.डी. एस.कट्यारे यांनी जबाबदारी पार पाडली. याप्रसंगी उपस्थित सर्व नूतन पदाधिकारी आणि क्रियाशील सदस्यांनी अशफाक पिंजारी यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या गेल्या.