जळगाव प्रतिनिधी । राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासामोर जेलभरो आंदोलन केले. यावेळी विविध मागण्याचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे 60 हजार अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. अशा स्वयंसेविकांचे दरमहा 1 हजार 500 रूपये मानधनाव्यतिरिक्त मोबदला आणि गटप्रवर्तक प्रवासभत्ता म्हणून दरमहा 8 हजार 725 रूपये अदा करण्यात येतात. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा दिला मोबदला व मानधन हे अत्यंत कमी असून शासनाने यांचे गांभिर्य लक्षात घेवून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना किमान वेतन विनाविलंब लागू करावे यासाठी मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी यांची होती उपस्थिती
रामकृष्ण पाटील, कल्पना भोई, उषा महाजन, आशा पाटील, जयश्री पाटील, भारती सपकाळे, अनिता कोल्हे, प्रिती चौधरी, भारती तायडे, मासा बोरसे, रविशा मोरे, शितल सोनवणे, भागीरथी पाटील, ज्योती पाटील, सुनिता भोसले, सुनंदा पाटील, अनिता चौधरी, ज्योती कोळी, आरती वंजारी, लता वाकचौरे, चंद्रकला पाटील, वंदना साळुंखे, वंदना पाटील, भारती नेमाडे, उषा मोरे आदींनी सहभाग नोंदविला.