यावल प्रतिनिधी । कोरपावली येथूनच जवळ असलेल्या हरिपुरा गावाजवळील हसन बाबा यांच्या दर्गाहवर आसेम आदिवासी सेवा मंडळाच्या वतीने आदिवासी समाजसेवक व समाजासाठी रात्री आहोरात्री झटणाऱ्या व्यक्तींचा एक छोटासा कार्यक्रम करून मान्यवरांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात 11 वाजता हसन बाबा च्या दर्गाह वर चादर चढवुन सर्व समाजासाठी व कामील शेठ यांचे तंदुरूस्तीसाठी दु:आ करण्यात आली. त्यानंतर कामील शेठ यांना जलेबीत तोलुन दुआ करण्यात आली कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी तालुक्याचे आमदार माननीय शिरीष चौधरी होते.त्यानंतर हमीद भायखा रा.पाल यांनाआदिवासी सेवा मंडळतर्फे अनेक मान्यवराचा उपस्थितीत आदिवासी तडवी-भिल्ल जीवन गौरव पुरस्कार आमदार शिरीष यांच्या हस्ते देण्यात आला.
तसेच कोरोनाच्या कालावधीत आपल्या तडवी भिल्ल रूग्णवाहिका व्दारे, गरजु पेशंट ला अतितात्काळ सेवा देण्या बाबत आपले राजु दिलदार.रा.मालोद, व नसरूदिन सरदार तडवी. रा. मालोद.यांना आदिवासी तडवी भिल्ल कोरोना योद्धा म्हणून सम्मान पत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच समाजात आपल्या कवीतेतुन जनजागृती करणारे विनोद बाबु रा. नायगाव. यांना आदिवासी तडवी भिल्ल उत्कृष्ट कवी म्हणून गौरवण्यात आले.
तसेच आवेश मुबारीज ह्या विध्यार्थीने नेट सेट परीक्षेत ७२०पैकी ४२९गुण प्राप्त करून एमबीबीएस ला प्रवेश मिळव ल्या बद्दल उत्कृष्ट विध्यार्थी म्हुणुन आवेश मुबारीज तडवी रा फैजपूर. यांना प्रशस्त पत्र व स्मृति चिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच तडवी भिल्ल रॅप सॉगंची निर्मिती करून समाजातील रूढी परंपरा, शिक्षण च्या बाबतीत प्रचार व प्रसार करून आशीष मुत्सुफा व त्यानंच्या टिम ला उत्कृष्ट रॅप गीत निर्माण केल्या बद्दल गौरवण्यात आले. कार्यक्रमात बहुसंख्य समाजसेवक उपस्तीत होते.