
जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या खाचणे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. पर्यवेक्षक डॉ. मिलींद बागुल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विचार मांडले. प्रसंगी शाळेचे उपशिक्षक एल. जे.पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन मंगला नारखेडे तर आभार चारूलता टोके यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.