नंदूरबार-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नंदूरबार जिल्हयात धडगाव तालुक्यातील खुटवडा गावामध्ये रस्ते व काही ठिकाणी पुलाचे बांधकाम अर्धवट असल्याने स्थानिक लोकांना अनेक अडचणी येत आहेत.
देश स्वातंत्र्यानंतर ७६ वर्ष पूर्ण झाली असली तरी गावामध्ये पक्का रस्ता नसल्या कारणाने शालेय शिक्षण-उच्च शिक्षणासाठी आणि गरोदर महिलांना प्रसुतीसाठी व प्राथमिक उपचारासाठी तालुका रुग्णालय धडगाव याठिकाणी घेऊन जावे लागते.
सदर रस्ता धडगाव तालुक्यापासून १७ कि.मी ऐवढे अंतर असून, एमएसएच-१ ते खुटवडा-कुडब्यापाडा एकूण ७.५ कि.मी. अंतर ४ वर्षा अगोदर रस्ता मंजूरी मिळून सुद्धा रस्त्याचे कामाची सुरुवात अद्यापही झाली नसून स्थानिक लोकांना अनेक अशा समस्या उद्भवत आहेत.