Home धर्म-समाज यावल तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. धिरज चौधरी यांची निवड

यावल तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. धिरज चौधरी यांची निवड

0
35

यावल प्रतिनिधी । येथील तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. धिरज चौधरी, सचिवपदी ॲड. निलेश मोरे व ग्रंथपालपदी ॲड. दत्तात्रेय सावकारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

यावल येथे आज दिनांक ३० जुन रोजी यावल तालुका वकील संघाची बैठकीचे सुचक ॲड. नितीन एम. चौधरी तर अनुमोदक ॲड. गोवींद एम . बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असुन , यात वकील संघाच्या तालुका नुतनकार्य कार्यकारणीची निवड करण्यात येवुन अध्यक्षपदी ॲड. धिरज व्ही . चौधरी यांची तर सचिवपदी ॲड. निलेश पी . मोरे आणी ग्रंथपालपदी ॲड. दत्तात्रेय सी. सावकारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली . तालुका वकील संघाच्या या बैठकीस ॲड. एस.जी. कवडीवाले, ॲड. आर .पी . गडे , ॲड. के डी पाटील, ॲड. एस आर लोंढे, ॲड. नितिन एम चौधरी, ॲड. ए आर सुरळकर , ॲड. जी एम बारी , ॲड. खालीद ए शेख , ॲड. ए एस कुलकर्णी , ॲड. यु सी बडगुजर , ॲड. मोहीत शेख अमीन ,ॲड. निवृत्ती पी पाटील , ॲड. देवेन्द्र आर बाविस्कर , ॲड. के डी सोनवणे ,ॲड. गौरव के पाटील , ॲड. राजेश बारी आदी सदस्य या बैठकीस प्रामुख्याने उपस्थित होते . दरम्यान बैठकीत कोरोना विषाणुसंसर्गाच्या पार्श्वभुमीवर शासनाने लागु केलेल्या संचारबंदी नियमांची यावेळी काटेकोर अमलबजावणी करण्यात आली . यावेळी उपस्थित सर्व संघाच्या सदस्यांच्या वतीने नुतन अध्यक्ष व सचिव आणी ग्रंथपाल यांचे स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्यात.

 


Protected Content

Play sound