पाचोऱ्यात काँग्रेसचे ढोल बजाव आंदोलन करताच धान्य पुरवठा ऑफलाइनचे प्रांतांचे आदेश

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा-भडगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात महिनाभरापासून लाभार्थींचा धान्य साठा तांत्रिक कारणामुळे पडून होता पाचोरा काँग्रेसने ढोल बजाव आंदोलन करताच शासन प्रणाली खडबडून जागे झाली आणि तात्काळ धान्य पुरवठा करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी यांनी दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेसाठी शासन स्वस्त धान्य दुकानाच्या मार्फत धान्य पुरवठा करत असतो मात्र पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना संपुर्ण धान्य साठा मिळाल्यावर देखील लाभार्थींना तांत्रिक कारणामुळे ऑनलाइन प्रणाली नादुरुस्त असल्यामुळे वितरित करण्यात आला नव्हता त्यामुळे पाचोरा भडगाव तालुक्यातील गोरगरीब सर्वसामान्य जनता गेल्या महिन्याभरापासून वंचित होती मात्र काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्यासमोर झोपलेले शासन आणि सत्ताधारी आमदार यांना जागे करण्यासाठी ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले या आंदोलनाची गंभीर दखल उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी घेऊन पाचोरा भडगाव तालुक्यातील लाभार्थी जनतेला तात्काळ धान्य पुरवठा ऑफलाइन करण्याचे आदेश पारित केले.

यामुळे आंदोलनाला यश मिळाले या आंदोलनात तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शहराध्यक्ष अॅड अमजद पठाण, प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकीरा, जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शरीफ खाटीक,जिल्हा सचिव इरफान मनियार, युवक विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष कल्पेश येवले, झानेश्वर पाटील, महिला जिल्हा सरचिटणीस संगीता नेवे, उपाध्यक्षा कुसुमताई पाटील डॉक्टर सेल तालुका अध्यक्ष डॉ. मंजूर खाटीक, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष शरीफ शेख, तालुका उपाध्यक्ष सुनील पाटील, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, पिंपळगाव प्रकाश चव्हाण,संदिप पाटील वाघुलखेडा, दिगंबर पाटील, शंकर सोनवणे, अल्ताफ खान, अजीम देशमुख, नदीम शेख, आबिद शेख जाबीर बागवान, मुस्तगिर टकारी, नईम मन्यार, रवी पावरा, सै. सय्यद युनुस मणियार, सचिन सोनवणे, आतिश सोनवणे आदी उपस्थित होते.

Protected Content