आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी

मुंबई । सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजे आर्यन खानची कोठडी 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलीय.

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी रविवारी अटक केली होती. यानंतर कालच आर्यन खानला एक दिवसाची एनसीबी कोठडी देखील सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज आर्यनसह इतर सात आरोपींना मुंबईतील किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. याबाबत न्यायालयाने निर्णय दिला. त्यानुसार आर्यन खानबरोबरच मुनमुन व अरबाज या दोघांना देखील सात ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली गेली आहे.

आर्यन खानकडून वकील सतीश मानशिंदे यांनी बाजू मांडली. तर दुसरीकडे, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह हे एनसीबीकडून बाजू मांडली.

 

Protected Content