नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्लीत भाजपच्या मुख्यालयासमोर रविवारी ‘जेल भरो’ कार्यक्रमाची घोषणा केली आहे. भाजपने जेल-जेलचा खेळ खेळू नये, उद्या मी माझ्या सर्व वरीष्ठ नेत्यांसोबत दुपारी १२ वाजता भाजप मुख्यालयात जाणार आहे.
रोज एका एका नेत्याला विनाकारण अटक करण्याचे सत्र सुरू आहे. त्यापेक्षा जी काही अटक करायची ती सर्वांना एकदाच करा, अशी मागणी केजरीवाल करणार आहेत. तुम्ही जितक्या नेत्यांना तुरुंगात टाकाल तितकी आमची वाढ होईल. केजरीवाल यांनी 2 मिनिटे 33 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये आपले मत व्यक्त केले.