Home Cities एरंडोल एरंडोलला पेट्रोलपंपावर बंदुकीच्या धाकाने लुटमार

एरंडोलला पेट्रोलपंपावर बंदुकीच्या धाकाने लुटमार



एरंडोल (प्रतिनिधी) येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील एका पेट्रोल पंपावर पिस्तुलाचा धाक दाखवत रोकड लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासचक्र फिरवायला सुरुवात केली आहे.

या संदर्भात अधिक असे की, धरणगाव येथील बाबूलाल शहा यांचा एरंडोलपासून साधारण ५ कि.मी अंतरावर नवीन धारागीर गावाजवळ हाय-वे वर एम.जी शहा नावाने पेट्रोल पंप आहे. शुक्रवारी रात्री पेट्रोलपंपावर रवींद्र पाटील व निलेश पाटील हे दोन कर्मचारी नेहमी प्रमाणे कामावर होते. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने आले. त्यानंतर त्यांनी दोघं कर्मचारींना बंदुकीचा धाक दाखवून साधारण ४७ हजाराची रोकड लंपास केली. या घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली. परंतु दरोडेखोर मिळून आले नाहीत. दरम्यान, या संदर्भात एरंडोल पोलिसात पेट्रोल पंपवरील कर्मचारी रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दरोडेखोरांविरूढ जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound