मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत खान्देशातून माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी व गफ्फार मलीक यांचा समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षातील मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. यात जळगाव जिल्ह्यातून माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी आणि पक्षाच्या अल्पसंख्य आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलीक यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. या यादीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रीया सुळे यांच्यासह मान्यवर नेत्यांचा समावेश आहे. या यादीत राज्यभरातील नेत्यांचा समावेश आहे. तर अरूणभाई गुजराथी आणि गफ्फार मलीक हे जिल्ह्यातूनच नव्हे तर खान्देशातून निवड करण्यात आलेले दोन नेते आहेत. अर्थात धुळे व नंदुरबार जिल्ह्यास या यादीत प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. पक्षाचे हे सर्व स्टार प्रचारक निवडणुकीच्या कालखंडात विविध मतदारसंघांमधील सभा, रॅली, मेळावे यांच्यात प्रमुख वक्ते म्हणून कामगिरी बजावणार आहेत.