धानोरा.ता.चोपडा (वार्ताहर) धोनारासह परिसरातील १४ गावांमध्ये रविवारी दुपारी आलेल्या वादळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले होते. आज माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
दि २ रोजी दुपारी वादळी तडाख्यात १४ गावातील शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात प्राथमिक अंदाजात तब्बल ११०० हेक्टरावरील केळी आणि अन्य पिकं नेस्तानाभुत झाले आहेत. प्राथमिक स्वरुपात अमळनेर प्रांतअधिकारी, चोपडा तहसिलदार, नायब तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून पाहणी करण्यात आली. यात हाती आलेला घास अचानक निसर्गाने हिरावल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. दरम्यान, बिडगाव, मोहरद, वटार, सुटकार, चांदसणी, वडगाव या गावांची नुकसानाची आकडेवारी उपलब्ध झाली नाही. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी नुकसानग्रस्त काही भागांची पाहणी करुन प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सोनवणे, तालुकाअध्यक्ष राजेंद्र पाटील,अल्पसंख्याकचे रज्जाक तडवी, अनिल महाजन, पन्नालाल पाटील, रतिलाल पाटील, रविंद्र पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, बिडगाव परिसरातील शेत शिवारात फक्त सिंगल फेस चालू असून थ्रिफेस लाईट बंद आहे. तसेच बाकी भागत लाइट चालु आहे.